चित्रकथी निर्मिती

Being Human | Being Rational


चित्रपटचला, ही दिवाळी फटाकेमुक्त साजरी करूयात!


आपण निरागस असतो का?

—I am Innocent?

फीचर्स

आमची ओळख

चित्रकथी निर्मिती ही संस्था नाट्यचित्रपट क्षेत्रात काही मूल्यनिर्मिती करू इच्छिते. गेल्या काही वर्षांपासून ह्या क्षेत्रात आपण काहीतरी करावे असे वाटत होते. अचानक एक दिवस एफटीआयआयचा विद्यार्थी अक्षय इंडिकर व त्याची सहकारी तेजश्री कांबळे माझ्याकडे आले. त्यांनी ज्येष्ठ लेखक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्यावर एक डाॅक्युफिक्शन फिल्म बनवली आहे असे सांगितले व मी अर्थसाह्य करून निर्माता व्हावं अशी विनंती केली. आणि संस्थेची वाटचाल सुरू झाली. संस्था सुरू करतांना मनात निश्चित अशा काही कल्पना होत्या. व आहेत. आपण काय निर्माण करावं हे ठरवून घेतलं. ही संस्था कधीही कोणतीही कलाकृती बनवतांना हिंसा, जात, धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांडं, दैववाद ,जातीय-भाषीय-प्रदेशीय अस्मिता ह्या गोष्टींना अजिबात थारा देणार नाही. म्हणूनच संस्थेची टॅग लाईन ठरली, Being Human Being Rational . शाॅर्ट फिल्मस, फिचर फिल्मस, डाॅक्युमेंटरीज वगैरे बनवण्याचा मानस आहे.

chitrakathiproductions@gmail.com
Pune-MH
INDIA
Phone: (020) 2556 0331